AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी स्कूटरवर विकले स्नॅक्स, सुब्रत रॉय यांनी असे उभे केले सहारा साम्राज्य

Subrata Roy | सहारा ग्रुपचे सुप्रीमो सुब्रत रॉय यांचे निधन झाले. ते बिहारमधील अररिया जिल्ह्यातील आहेत. त्यांनी कोलकत्ता येथे शिक्षण घेतले. नंतर ते गोरखपूर येथे पोहचले. 1978 मध्ये रॉय यांनी आपल्या एका मित्रासोबत स्कूटरवर बिस्किट आणि स्नॅक्सची विक्री केली. त्यानंतर सहाराचे भलेमोठे साम्राज्य उभारलं.

कधी स्कूटरवर विकले स्नॅक्स, सुब्रत रॉय यांनी असे उभे केले सहारा साम्राज्य
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 10:16 AM

सहारा समुहाचे प्रमुख सु्ब्रत रॉय यांनी 75 व्या वर्षी यांनी मंगळवारी रात्री अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या आयुष्याचा पट एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा वेगळा नाही

एकेकाळी खासगी विमान कंपनीपासून ते हॉकी, क्रिकेटच्या टीमपर्यंत सहारा परिवाराचा सर्वच क्षेत्रात मोठा दबदबा निर्माण झाला होता. फायनान्स, रिअल इस्टेट, एफएमसीजी, मीडिया क्षेत्रापर्यंत त्यांच्या व्यवसायाचा पसारा होता.

1978 मध्ये त्यांनी मित्रासोबत स्कूटरवर स्नॅक्स आणि बिस्किटं विकली. त्यांनी दोन लाख कोटींपेक्षा मोठे साम्राज्य उभं केले. अल्पबचतीवर ग्राहकांना चांगला परतावा दिला. या निधीच्या माध्यमातून त्यांनी हे साम्राज्य उभं केलं.

हे सुद्धा वाचा

त्यांनी 1978 मध्येच चिटफंड कंपनी उभी केली. सहारा सहकारातील एक ब्रँड तयार झाला. एका खोलीतून सुरु झालेला हा प्रवास एका मोठ्या समूहात पसरला. देशभरात सहाराच्या शाखा विस्तारल्या. मध्यमवर्ग आणि गरिबांचा त्यांनी काही काळ विश्वास संपादन केला.

स्मॉल फायनान्सिंग, अल्पबचत योजनांमधून सहाराची समूहाने सुरुवात केली. हळूहळू अनेक क्षेात ही कंपनी विस्तारली. रिअल इस्टेट, टाऊनशिप, मीडिया, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण, हॉटेल्स, एफएमसीजी, टेक्नॉलॉजी या सारख्या अनेक क्षेत्रात कंपनीने पाय रोवले.

कथित अनियमिततेच्या आरोपाखाली सहाराविरोधात 2010 मध्ये तक्रार दाखल झाली. सेबीने याप्रकरणी नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवला. सुप्रीम कोर्टाने पण हेच मत नोंदवले. सुब्रत रॉय यांना तीन वर्षांचा तुरुंगवास झाला. 2017 मध्ये ते पॅरोलवर बाहेर आले.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....