

घरात सात घोडे धावत असलेला फोटो लावणं वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानलं जातं. हा फोटो सकारात्मक ऊर्जा, सुख समृद्धी आणि यशासाठी लाभदायी मानला जातो.

वास्तुशास्त्रानुसार हा फोटो यश, प्रगती, विजय आणि आनंदाचं प्रतीक मामलं जाते. हा फोटो लावल्याने करिअर, उद्योगधंदा आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल बघायला मिळतात.

वास्तुशास्त्रात हा फोटो लकी मानला जातो. या फोटोत भाग्य चमकवण्याची ताकद असल्याचं बोललं जातं. धावणारे घोडे यश आणि प्रगतीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे हा फोटो घरी नक्की लावला पाहीजे. हा फोटो लावल्यानंतर काही दिवसातच प्रगती दिसून येते.

वास्तुशास्त्रानुसार, घरात धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावल्याने आर्थिक संकट दूर होतं. आर्थिक प्रगतीचे नवी दारं खुली होतात. इतकंच काय समाजात मानसन्मान मिळतो.

फोटो घरातील कोणत्या दिशेला लावला आहे यावरून लाभ ठरतो. दक्षिण दिशेला लावल्यास प्रसिद्धी आणि यश मिळते. उत्तर दिशेला लावल्यास धन आणि समृद्धी येते. पूर्व दिशेला लावल्यास करिअरमध्ये प्रगती होते.

(Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 मराठी त्याची पुष्टी करत नाही.)