61 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट रोमँटिक गाणं, ज्याचा शाहरुख देखील आहे चाहता, आजही गाणं प्रचंड चर्चेत
रोमान्सचा बादशाह असणारा शाहरुख खानचं देखील हे 61 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं आहे सर्वात आवडतं. ज्याला आशा भोसले यांनी दिलेला आवाज. आजही प्रचंड सुपरहिट.

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाणारे 'अभी ना जाओ छोड़कर' हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या आवडीचे आहे. विशेष म्हणजे, रोमान्सचा बादशाह मानला जाणारा शाहरुख खानने देखील या गाण्याचा सर्वात रोमँटिक गाण्यांमध्ये समावेश केला आहे.

हे गाणे 1961 साली प्रदर्शित झालेल्या 'हम दोनो' या चित्रपटातील असून त्यावर देव आनंद आणि साधना यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्याचे बोल साहिर लुधियानवी यांनी लिहिले होते, तर संगीत जयदेव यांनी दिले होते.

माहितीनुसार, संगीतकार जयदेव यांची इच्छा होती की हे गाणे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याची होती. मात्र, गाण्यातील काही शब्द आपल्या प्रतिमेला साजेसे नसल्याचे वाटल्याने लता मंगेशकर यांनी हे गाणे गाण्यास नकार दिला.

यानंतर हे गाणे आशा भोसले यांना देण्यात आले. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी एकाच मायक्रोफोनसमोर उभे राहून हे गाणे रेकॉर्ड केल्याचे सांगितले जाते. त्या काळात ही पद्धत आव्हानात्मक मानली जात होती.

गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. संगीत, भावपूर्ण शब्द आणि रफी आणि आशा भोसले यांच्या अप्रतिम गायकीमुळे हे गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर रोमँटिक गाण्यांपैकी एक बनले.