शाहरुख खानच्या चित्रपटाला नावच सापडेना; 5 हजारांचं बक्षीस जिंकला हा अभिनेता

शाहरुख खानच्या या चित्रपटाला मिळत नव्हते नाव. म्हणून त्याने या चित्रटाला जो चांगले नाव सुचवेल त्यासाठी 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अनेक जणांच्या प्रयत्नानंतर या अभिनेत्याने जिंकलं बक्षीस.

| Updated on: Aug 06, 2026 | 1:37 PM
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाची कथा जितकी महत्त्वाची असते, तितकेच त्याचे शीर्षकही महत्त्वाचे असते. शाहरुख खान आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'जब हैरी मेट सेजल' या चित्रपटाचे नाव ठरवताना मात्र संपूर्ण टीमला मोठी कसरत करावी लागली होती.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाची कथा जितकी महत्त्वाची असते, तितकेच त्याचे शीर्षकही महत्त्वाचे असते. शाहरुख खान आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'जब हैरी मेट सेजल' या चित्रपटाचे नाव ठरवताना मात्र संपूर्ण टीमला मोठी कसरत करावी लागली होती.

2 / 5

योग्य नाव सापडत नसल्याने शाहरुख खान यांनी गंमतीत जाहीर केले होते की, जो या चित्रपटासाठी सर्वोत्तम शीर्षक सुचवेल त्याला 5000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अनेक नावे समोर आली, पण कोणतेही नाव सर्वांना पसंत पडले नाही.

3 / 5

अखेर अभिनेता रणबीर कपूरने 'जब हॅरी मेट सेजल' हे नाव सुचवले. हे शीर्षक संपूर्ण टीमला इतके आवडले की ते लगेच अंतिम करण्यात आले. दिलेल्या शब्दाप्रमाणे शाहरुख खानने रणबीर कपूरला 5000 रुपयांचे बक्षीसही दिले.

4 / 5

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हा मजेशीर किस्सा मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होती. एका टूर गाईड हॅरी आणि गुजराती तरुणी सेजल यांच्या युरोपमधील प्रवासाची आणि हरवलेल्या अंगठीच्या शोधात फुलणाऱ्या प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित होता.

5 / 5

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यातील गाणी, युरोपमधील देखणी लोकेशन्स आणि शाहरुख-अनुष्काची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us