दुबईतील शाहरुखच्या नावाच्या टॉवरमध्ये घर खरेदी करण्यासाठी किती रुपये लागतात?
बॉलिवूडच्या सुपरस्टार शाहरुख खानचे नाव आता दुबईच्या लक्झरी रिअल इस्टेट बाजारपेठेतही चर्चेत आहे. Danube Properties ने शाहरुख खान सोबतची भागीदारी पुढे नेत दुबई मेरिटाइम सिटीमध्ये ‘शाहरुख्ज रेसिडेंसेस बाय डॅन्युब’ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

दुबईच्या रिअल इस्टेट बाजारपेठेत बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या नावाने एक नवीन लक्झरी निवासी प्रकल्प लॉन्च करण्यात आला आहे. Danube Properties ने आपला नवीन प्रकल्प शाहरुख्ज रेसिडेंसेस बाय डॅन्युबची घोषणा केली आहे. हा टॉवर दुबईच्या मेरिटाइम सिटीमध्ये बांधला जाणार आहे. आता या टॉवरमधील घरांची किंमत काय असणार? चला जाणून घेऊया...
कंपनीच्या मते, हा जगातील पहिला असा निवासी टॉवर आहे, ज्याचे नाव एखाद्या सेलिब्रिटीच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पात समुद्र आणि दुबईच्या उंच इमारतींचे भव्य दृश्य दिसून येईल.
येथे पूर्णपणे सुसज्ज अपार्टमेंट्स मिळतील, ज्यांची सुरुवातीची किंमत १६.५ लाख UAE दिरहम ठेवण्यात आली आहे. भारतीय चलानानुसार ही किंमत जवळपास 4 कोटी 29 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जाते.
या प्रकल्पाला खास बनवण्यात शाहरुख खानसोबत त्याची पत्नी आणि प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर गौरी खानचीही महत्त्वाची भूमिका आहे.
दुबई मेरिटाइम सिटीमध्ये विकसित केला जाणारा हा एक लक्झरी निवासी टॉवर आहे. ही शाहरुख खान आणि Danube Properties यांच्या भागीदारीची पुढची पायरी आहे. यापूर्वी कंपनीने Shahrukhz by Danube नावाने एक व्यावसायिक टॉवर सादर केला होता, जो लॉन्चच्या दिवशीच पूर्णपणे विकला गेला होता. कंपनीचे म्हणणे आहे की ग्राहकांकडून मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर त्यांनी हीच भागीदारी निवासी क्षेत्रात पुढे नेण्याचा निर्णय घेतला.