
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाखांचं रोख बक्षीस देऊ अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव अविनाश देशमुख यांनी केली आहे.

आज (20 सप्टेंबर) राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या वतीने बदलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यामुळे राज्यभरात याचे पडसाद उमटले आहेत. बदलापुरातही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली.

एकच नाही तर पडळकर यांची जीभ जो कोणी छाटेल त्याला पाच लाखांचं रोप पारितोषिक दिलं जाईल अशी घोषणा यावेळी अविनाश देशमुख यांनी केली.

या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या निषेधाचे पोस्टर्सही दाखवण्यात आले. तसेच पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.