
सोशल मीडियाच्या विश्वात आपली दमदार उपस्थिती नोंदवणारी अनीत पड्डा आज लाखो युवक-युवतींची प्रेरणास्थान बनली आहे. पण अनीत पड्डा कुठला धर्म मानते या बद्दल तुम्हाला माहित आहे का? तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?.

आज सगळीकडे सैयारा चित्रपटाची चर्चा आहे. सैयारा चित्रपट पाहून अनेक मुला-मुलींना रडू कोसळतय. सैयारा चित्रपटामुळे फेमस झालेली बॉलिवूड अभिनेत्री अनीत पड्डाचा जन्म एका पंजाब शीख परिवारात झाला.

अनीत पड्डाचा जन्म 14 ऑक्टोंबर 2002 रोजी पंजाब अमृतसर येथे झाला. अमृतसरमध्ये शीख धर्माच पवित्र तीर्थस्थळ सुवर्ण मंदिर आहे. अनीतच कुटुंब शीख रिती-रिवाजांच पालन करतं. लहानपणापासून तिला गुरबाणी, सेवा आणि संयमाच महत्त्व शिकवण्यात आलय.

तिचं पालन पोषण शीख परंपरेनुसार झालय. यात गुरुद्वारामध्ये जाणं, कीर्तन आणि सेवा प्रमुख आहे.

अनीत पड्डा भले आजकाल ट्रेंडिंग व्हिडिओ आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असेल. पण तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समधून अनेकदा पंजाबी आणि शीख संस्कृतीची झलक पहायला मिळते.