
कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी घोटी शहरापासून ८० किलोमीटर दूर असलेल्या अकोला तालुक्यातील शिरपुंजेचा " भैरवगडाची " सकाळी चढाई करून गडावर निसर्गरम्य वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धअभिषेक केला.

तसेच बालशिवाजीना पाळण्यात ठेवून महिला भगिनींनी ओव्या गात, गिर्यारोहकांनी छत्रपतींचा जयजयकार केला.

ध्वनी प्रदूषण टाळीत डीजे, गुलाल, इतर वायफळ खर्चाला फाटा देत निसर्गाच्या सानिध्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

शिवजयंती निमित्ताने किल्ल्यावर असलेल्या प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या व इतर कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

कळसुबाई मित्र मंडळाच्या अखंडपणे २७ वर्षांपासून चालत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या शिवजयंती महोत्सवात कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळासाहेब आरोटे, गजानन चव्हाण, निलेश पवार, अशोक हेमके,भगीरथ म्हसने,संजयमंत्री जाधव,राहुल हांडे,लक्ष्मण जोशी,गोकुळ चव्हाण, सुरेश चव्हाण,सायरा खलिफा, नगमा खलिफा,गायत्री मराडे, प्रियंका मराडे,चतुर्थी तोकडे,पुष्कर पवार,अर्चित हेमके,लोकेश चव्हाण तसेच इतर शिवप्रेमी सहभागी झाले होते.