जय शिवराय… घोषणांनी दुमदुमून गेला रायगड…सर्वत्र शिवमय वातावरण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर मोठा सोहळा साजरा करण्यात आला. ज्यामुळे संपूर्ण गडावर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो शिवभक्त सकाळपासून गडावर दाखल झाले आहेत.

| Updated on: Jun 06, 2026 | 12:02 PM
1 / 5
शिवरायांच्या पवित्र चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. जय शिवरायच्या घोषणांनी रायगड दुमदुमून गेला असून शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवरायांच्या पवित्र चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. जय शिवरायच्या घोषणांनी रायगड दुमदुमून गेला असून शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

2 / 5

आज रायगडावर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी ची गर्दी पाहायला मिळत आहेत त्यात अनेक शिवप्रेमी गडावर पारंपरिक वेषभुषा करुण आले आहेत. सध्या या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.

3 / 5

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेका साठी आज महाराष्ट्रच्या सात नद्यामधून आणि प्रतापगडच्या मंदिरातून आज गंगा जल आणण्यात आले आहे. महाराजांच्या प्रथम राज्याभिषेकाला देखील देशभरातून पवित्र जल आणण्यात आले होते.

4 / 5

महाराजांच्या प्रथम राज्याभिषेक ज्या परंपरेनुसार करण्यात आलं, तीच परंपरा कायम ठेवत आज या पवित्र जलाच्या माध्यमातून महाराजांचं राज्याभिषेक करण्यात आलं. सांगायचं झालं तर, महाराष्ट्रमध्ये शिवाजी महाराज यांच्या बद्दल प्रेम प्रत्येक लहान मुलापासून सगळ्यांना आहे.

5 / 5

त्यातच आज रायगडावर अनेक शिवभक्त येत असताना 4 वर्षाची लहान शिवकन्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. या शिवकन्याने रायगडावर आता पर्यंत 200 झाडे लावली आहेत. तसेच ह्या शिवकन्याला महाराष्ट्रामधील चार पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us