AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वचषक अंतिम सामन्यानंतर भर मैदानात अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा राडा, थेट मारहाण, धक्कादायक व्हिडीओ..

Spain vs Argentina Fight : फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह होता. फायनलचा सामना जोरदार रंगला. स्पेनकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेंटीनाच्या खेळाडूंनी थेट मैदानावरच मोठा राडा केला.

विश्वचषक अंतिम सामन्यानंतर भर मैदानात अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा राडा, थेट मारहाण, धक्कादायक व्हिडीओ..
Spain vs Argentina Fight
| Updated on: Jul 20, 2026 | 8:05 AM
Share

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह होता. फायनलमध्ये स्पेनकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेंटीनाच्या खेळाडूंनी थेट मैदानावरच मोठा राडा केला. न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियममध्ये महामुकाबला झाला. हा सामना संपताच एक टीम विजयाचा उत्साह साजरा करत होती तर दुसरी टीम मात्र निराश होती. यादरम्यानच भर मैदानात अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी राडा घातला. अर्जेंटिना मिडफील्डर लिआंड्रो परेडेस आणि स्पेनच्या खेळाडूमध्ये मोठा वाद झाला. थेट एकमेकांना भर मैदानात अंगावर धावून धक्के मारताना खेळाडू दिसले. आता यादरम्यानचाच व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. फायलनची शेवटची शिट्टी वाजताच स्पेनचे खेळाडू आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा उत्साह साजरा करत होते.

यादरम्यानच परेडेस थेट स्पेनच्या डिफेंडर एरिक गार्सिया जवळ पोहोचला. सुरूवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही सेकंदातच प्रकरण इतके जास्त वाढले की, परेडेस याने कोणताही विचार न करात गार्सिया याला जोरदार बुक्का मारला. परिस्थिती सांभाळत स्पेनचा मिडफिल्डर गावी दोघांना शांत करताना दिसला. गावीने दोन्ही खेळाडूंना दूर करण्याचा प्रयत्न केला.

पण परेडेसचा राग अजिबात शांत झाला नाही. त्याने भांडणे मिटवण्यासाठी आलेल्या गावी याच्यावरच थेट हात उचलला. यानंतरही परेडेस याने गावीच्या चेहऱ्यावर हात लावला. यादरम्यान हा वाद थांबवण्याकरिता अजून काही खेळाडू पोहोचले. अर्जेंटिनाचा खिळाडू थियागो अल्माडा यानेही मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

90 मिनिटे दोन्ही टीममध्ये एकही गोल झाला नव्हता. त्यानंतर या महामुकाबल्यात अधिकचा टाईम हा देण्यात आला. 106 व्या मिनिटाला फेरान टोरेस याने रिबाउंडवर जोरदार गोल केला आणि स्पेन 1-0 अशी बढत मिळवली. हाच गोल या सामन्यात निर्णयाक सिद्ध झाला. दुसऱ्यांदा स्पेन थेट फीफा वर्ल्ड चॅम्पियन बनला. चाहत्यांमध्ये या फीफा वर्ल्डकप 2026 बद्दल मोठी क्रेझ होती. त्यामध्येच दमदार महामुकाबला रंगला. अंगावर शहारे आणणार सामना नक्की कसा असतो हे या महामुकाबल्यात दिसले.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे बनवण्यावर भर
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा