AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहितने शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती केली बंद, तरीही गिल हिटमॅनच्या रिटारयमेंटवर म्हणाला की…

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका पार पडली जी इंग्लंडने जिंकली, आता शेवटच्या लॉड्

Rohit Sharma : रोहितने शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती केली बंद, तरीही गिल हिटमॅनच्या रिटारयमेंटवर म्हणाला की...
shubman gill on rohit shrama
| Updated on: Jul 20, 2026 | 8:27 AM
Share

भारत इंग्लंड वनडे मालिका पार पडली. ही मालिका इंग्लंडने 2-0 ने जिंकली. टी-20 मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिकाही गमावली आहे, लॉर्ड्स येथे रंगलेल्या सामन्यात रोहित शर्माने दमदार शतक झळकावले. रोहितच्या शतकी खेळीनंतर पुन्हा एकदा त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर पकडू लागल्या. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  आता मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने, माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या चर्चांवर विधान केले.

रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल शुभमन गिल म्हणाला, “त्याने (रोहित शर्माने) आम्हाला याबद्दल काहीही सांगितलेले नाही. मला वाटते की ही सर्व चर्चा फक्त माध्यमांमध्ये होत आहे, परंतु संघात अशी कोणतीही चर्चा किंवा संभाषण झालेले नाही.” यापूर्वी, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. दोन दिवसांनंतर, बीसीसीआयने अधिकृतपणे पुष्टी केली की रोहित शर्मा निवृत्त होणार नाही.

निवृत्तीच्या अफवांदरम्यान, हिटमॅन रोहित शर्माने बॅटने दमदार कामगिरी करत दाखवून दिले की त्याच्यात अजूनही भरपूर क्रिकेट बाकी आहे. इंग्लंडच्या 387/3 या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहितने लॉर्ड्सवर अशी खेळी केली ज्यामुळे भारताचा विजय जवळजवळ निश्चित झाला होता. लॉर्ड्सवर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने केवळ 110 चेंडूंचा सामना करत 17 शानदार चौकार आणि पाच उत्तुंग षटकारांसह 138 धावांची धडाकेबाज खेळी केली. रोहित आणि गिलने पहिल्या विकेटसाठी 147 धावांची धडाकेबाज भागीदारी करून धावांचा पाठलाग करण्यासाठी एक मजबूत पाया रचला. जरी भारत हा सामना 27 धावांनी हरला असला तरी, रोहितच्या खेळीने सर्वांची मने जिंकली.

कर्णधार गिलने आपल्या सलामीच्या साथीदाराचे कौतुक करत म्हटले, “रोहित भाईचा खेळपट्टीवरील अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. रोहितने ज्या प्रकारे खेळी केली ती अप्रतिम होती. बहुतेक वेळ मी नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभा राहून फक्त त्याची फलंदाजी पाहत होतो. पॉवरप्ले दरम्यान आमची चर्चा होती की आपल्याला विकेट्स हातात ठेवाव्या लागतील, कारण एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा तोच एकमेव मार्ग होता. एकदा का त्याने 60-70 धावा केल्या, की त्याची फलंदाजी पाहणे एक पर्वणी होती.”

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला