AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026 Prize Money : फायनल हरणाऱ्या अर्जेंटिनाला 318 कोटींचं बक्षीस, चँपियन स्पेनला मिळालेली प्राईज मनी ऐकून डोळेच विस्फारतील

फीपा वर्ल्ड कप 2026 ची फायनल जिंकून स्पेनने इतिहास रचला. मात्र त्यांनी फक्त वर्ल्डकपची ट्रॉफीच नव्हे तर भरभक्कम रक्कमही कमावली. चँपियन बनल्यावर स्पेनवर कोट्यवधी रुपयांची बरसात झाली तर उपविजेता संघ अर्जेंटिनाही काही रिकाम्या हाताने परतला नाही. विजेत्या संघाला मिळालेली हे सर्वात मोठी बक्षीस आहे.

FIFA World Cup 2026 Prize Money : फायनल हरणाऱ्या अर्जेंटिनाला 318 कोटींचं बक्षीस, चँपियन स्पेनला मिळालेली प्राईज मनी ऐकून डोळेच विस्फारतील
फिफा वर्ल्ड कप 20206 जिंकणाऱ्या स्पेनवर कोट्यवधींची बरसात
| Updated on: Jul 20, 2026 | 8:28 AM
Share

रविवारची मध्यरात्र अनेक फुटबॉल प्रेमींसाठी स्वप्नवत ठरली. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्याचा अनेकांनी आनंद लुटला. अतिरिक्त 30 मिनिटांच्या पहिल्या हाफमध्ये काही घडलं नाही. पण दुसऱ्या 15 मिनिटांच्या हाफमध्ये स्पेनने गोल करत अर्जेंटिनाला नमवलं. स्पेनने 16 वर्षांचा दुष्काळ दूर करून दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. याआधी त्यांनी 2010 साली दक्षिण आफ्रिकेत विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर काल, रोद्रीच्या नेतृत्वाखाली स्पेनने पुन्हा FIFA विश्वचषक 2026 जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव केला. सामना अतिरिक्त वेळेत (एक्स्ट्रा टाइम) गेला, जिथे फेरान टोरेसने निर्णायक गोल करत स्पेनला विजेतेपद मिळवून दिले. यामुळे मेस्सीने वर्ल्डकप विजेतेपदाचे स्वप्न भंगलं. मात्र स्पेनच्या या विजयाची चमक केवळ ट्रॉफीपुरती मर्यादित राहिली नाही. विश्वविजेते बनताच स्पेनने विक्रमी बक्षीस रक्कमही आपल्या नावावर केली.

स्पेनचा संघ मालामाल, हरणाऱ्या अर्जेंटिनावरही पैशांची बरसात

FIFA ने विश्वविजेत्या स्पेनला 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे 481 कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम दिली. FIFA विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही विजेत्या संघाला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. 2022 मध्ये अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकल्यानंतर 42 दशलक्ष डॉलर मिळाले होते. म्हणजेच यावेळी विजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत, तब्बल 8 दशलक्ष डॉलरची वाढ करण्यात आली.

तर फायनलमध्ये अर्जेटिंनाचा संघ हरला असला तरीही त्यांनाही बक्षीसाची भलीमोठ्ठी रक्कम मिळाली. उपविजेत्या संघाला 33 दशलक्ष डॉलर (सुमारे 318 कोटी रुपये) देण्यात आले, जी मागील विश्वचषकाच्या तुलनेत 3 दशलक्ष डॉलरने अधिक आहे. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या इंग्लंडला 29 दशलक्ष डॉलर (सुमारे 279 कोटी रुपये), तर चौथ्या स्थानावर राहिलेल्या फ्रान्सला 27 दशलक्ष डॉलर (सुमारे 260 कोटी रुपये) देण्यात आले.

तळाच्या क्रमांकावरील संघांनाही कोट्यवधींचे बक्षीस

यावेळी FIFA ने 48 संघांच्या नव्या स्पर्धा स्वरूपात (फॉरमॅट) बक्षीस रकमेतही मोठी वाढ केली. उपांत्यपूर्व फेरी (क्वार्टर फायनल) गाठणाऱ्या प्रत्येक संघाला 19 दशलक्ष डॉलर (सुमारे 183 कोटी रुपये) मिळाले. तर प्री-क्वार्टर फायनल (राउंड ऑफ 16) मध्ये बाहेर पडलेल्या प्रत्येक संघाला 15 दशलक्ष डॉलर (सुमारे 144 कोटी रुपये) देण्यात आले. राउंड ऑफ 32 मध्ये पराभूत झालेल्या प्रत्येक संघासाठी 11 दशलक्ष डॉलर (सुमारे 106 कोटी रुपये) बक्षीस निश्चित करण्यात आले होते. तसेच गट फेरीत (ग्रुप स्टेज) बाहेर पडलेल्या प्रत्येक संघाला 9 दशलक्ष डॉलर (सुमारे 87 कोटी रुपये) मिळाले.

याशिवाय, यंदा FIFA ने स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व 48 संघांना स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आर्थिक मदत दिली. प्रत्येक संघाला पात्रता शुल्क (क्वालिफिकेशन फी) म्हणून 10 दशलक्ष डॉलर (सुमारे 96 कोटी रुपये) आणि तयारीसाठी 2.5 दशलक्ष डॉलर (सुमारे 24 कोटी रुपये) देण्यात आले. म्हणजेच कोणत्याही संघाला पहिला सामना खेळण्यापूर्वीच एकूण 12.5 दशलक्ष डॉलर (सुमारे 120 कोटी रुपये) हमी रक्कम (गॅरंटी मनी) मिळाली. FIFA ने विश्वचषक 2026 मध्ये एकूण 871 दशलक्ष डॉलर (सुमारे 8,386 कोटी रुपये) वितरित केले, जे मागील स्पर्धेच्या तुलनेत 431 दशलक्ष डॉलरने अधिक आहे. यापैकी 655 दशलक्ष डॉलर कामगिरीच्या (परफॉर्मन्स) आधारे वितरित करण्यात आले, तर उर्वरित रक्कम पात्रता आणि तयारी फंड (क्वालिफिकेशन व प्रिपरेशन फंड) म्हणून देण्यात आल्याचे समजते.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच