
हिंगोलीतील शिवसैनिक शिवसेना भवनवर दाखल झाल्यानंतर शिवसेना भवनवरील सगळे वातावरण भगवेमय होऊन गेले होते, यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांना मार्गदर्शन करत हिंगोलीतील शिवसेना पक्षाची पुढील भूमिका काय असणार याबाबतही यावेळई मार्गदर्शन केले

हिंगोलीतील आलेल्या निष्ठावान शिवसैनिक ज्यावेळी शिवसेना भवनवर दाखल झाले त्यावेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाथ जोरदार घोषणाबाजी करत, या शिवसैनिकांना आपण शिवसेनेसोबतच आहोत असा विश्वासह त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

एकीकडे संतोष बांगर यांनी 50 गाड्या भरून हिंगोलीतील शिवसैनिकांना मुंबईत आणून शक्तिप्रदर्शन केले तर दुसरीकडे मात्र हिंगोलीतील निष्ठावान अनेक शिवसैनिकांनीही शिवसेना भवनवर येऊन पक्षप्रमुखांची भेट घेतली.

हिंगोलीचे जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी आज मुंबईत येऊन शक्तीप्रदर्शन केले, त्यांचवेळी शिवसेनेचाच हिंगोलीतील दुसरा गटाने शिवसेना भवनवर येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.