AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shweta Tiwari: श्वेता तिवारी सुस्साट! थायलंडमध्ये तिने जे केलं त्यामुळे…

श्वेता तिवारीने नुकताच थायलँडचा प्रवास केला. तिथे तिने प्रसिद्ध सॉन्गक्रान उत्सव साजरा केला, बिग बुद्ध आणि जेम्स बॉण्ड आयलँडसारखी ठिकाणे पाहिली आणि रायले बीचवर आनंद लुटला. स्थानिक बाजारपेठांमधील ताजी फळे तिने खूप आवडीने खाल्ली. या प्रवासात श्वेताने थायलँडच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि संस्कृतीचा आनंद लुटला.

| Updated on: Jul 24, 2025 | 7:40 PM
Share
जगातील सुंदर ठिकाणांपैकी थायलँड एक आहे. येथील नाईटलाइफ पाहण्यासारखी असते. तसेच येथील टूरिस्ट स्पॉटही पाहण्यासारखे असतात. बीच, आयलँड आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे थायलँडविषयी नेहमीच पर्यटकांच्या मनात आकर्षण असतं. सेलिब्रिटीही म्हणूनच या ठिकाणी येत असतात. श्वेता तिवारीनेही या ठिकाणी येऊन जीवाची दिवाळी केलीय.

1 / 6
श्वेता तिवारी 2024मध्ये थायलँडला आली होती. थायलँडच्या सर्वात लोकप्रिय Songkran festival मध्ये येऊन श्वेताने धम्माल केली होती. या फेस्टिव्हलमध्ये लोक एकमेकांवर पाणी फेकून आनंद लुटतात. आपल्याकडे रंगपंचमी असते तसं. पण फरक एवढाच की इथे फक्त पाणी फेकतात. रंगाचा वापर करत नाहीत. बौद्ध नव वर्षाच्या आनंदात हा उत्सव साजरा केला जातो.

2 / 6
या फेस्टिव्हलशिवाय श्वेताने थायलँडच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांवर एक्सप्लोअर केलं होतं. त्यात बिग बुद्ध हे ठिकाण आहे. फुकेट येथे हे स्थळ आहे. या ठिकाणी तुम्हाला तथागत बुद्धाच्या दोन मूर्त्या पाहायला मिळतील. त्यात एक 45 मीटर उंच तर दुसरी 92 मीटरची आहे. संगमरवरच्या या मूर्त्या असून दिसायला अत्यंत सुंदर आहेत.

3 / 6
श्वेताने थायलँडमध्ये James Bond Island लाही एक्लप्लोअर केलं. या आयलँडला खाओ फिंग कान नावानेही ओळखलं जातं. या आयलँडवरील निळे पाणी मोहून टाकतं. थायलँडच्या फंग ना खाडीवर हे आयलँड आहे. या ठिकाणी चुन्याच्या दगडाचे टापू, क्रिस्टल क्लिअर पाणी आणि गुंफा पाहायला मिळतात.

4 / 6
थायलँडचा रायले बीचही पाहण्यासारखा आहे. श्वेताचे हे फोटो याच बीचवरचे आहेत. या ठिकाणी श्वेता तिच्या मुलासोबत दिसते. हा बीच कराबीच्या जवळ आहे. या ठिकाणी तुम्हाला चुन्याच्या खडकाचे डोंगर आणि सुंदर समुद्र तट पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही रॉक क्लायम्बिंग सारख्या अॅक्टिव्हिटी करू शकता. या ठिकाणी अनेक रेस्टॉरंट आहेत, तिथे तुम्ही नाईटलाईफचा आनंद घेऊ शकता.

5 / 6
थायलँडमध्ये व्हेज फूड फार कमी मिळतात. पण स्थानिक बाजारात फ्रेश फ्रूट मोठ्याप्रमाणावर मिळतात आणि त्याला मागणीही मोठी असते. श्वेता तिवारीनेही लोकल मार्केटमध्ये जाऊन फ्रूटवर ताव मारला. या फोटोत ती आंबे खाताना दिसते.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.