
क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार होते. परंतु स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने हे लग्न पुढे ढकलल्याचं म्हटलं गेलं. यादरम्यान आता पलाश मुच्छलवर बरेच गंभीर आरोप होत आहेत. एका कोरिओग्राफरसोबतचे चॅट्स व्हायरल झाल्यानंतर पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे. अशातच पलाशची एक्स गर्लफ्रेंडसुद्धा चर्चेत आली आहे.

स्मृती मानधनाच्या आधी पलाश बिरवा शाहला डेट करत होता आणि तिलासुद्धा पलाशने अत्यंआहेत रोमँटिक पद्धतीने प्रपोज केल्याचा दावा करणारं ट्विट व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये फुलं, फुगे आणि सुंदर लाइट्सचं डेकोरेशन करून पलाश बिरवाला प्रपोज करताना दिसत आहे.

पलाश आणि बिरवाचा हा व्हायरल फोटो पाहून त्या दोघांमधील नात्याचा अंदाज सहज लावला जाऊ शकतो. या दोघांचा हा फोटो 2017 मधील असल्याचं म्हटलं जात आहे. पलाशने गुडघ्यांवर बसून बिरवाला प्रपोज केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, बिरवा शाह ही त्यावेळी मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेत होती.

'स्पोर्ट्सदुनिया' या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, पलाश मुच्छल आणि बिरवा शाह हे मुंबईत एका मित्राच्या माध्यमातून भेटले होते. त्यावेळी बिरवा मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये शिकत होती. तेव्हा पलाशसुद्धा तरुण संगीतकार म्हणून लोकप्रिय होता. 'तू ही है आशिकी'साठी तो ओळखला जात होता.

पलाश आणि बिरवाच्या कुटुंबीयांनाही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल माहीत होतं. इतकंच नव्हे तर दोन्ही कुटुंबीयांकडून त्यांच्या नात्याला पूर्ण पाठिंबासुद्धा होता. परंतु पलाश आणि बिरवाचं नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं.