पूजाच्या हातावर सोहमची मेहंदी रंगली, पण त्या एका फोटोनं… महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजींची सून एकदा पाहाच

Soham Bandekar and pooja Birari : सध्या सर्वत्र सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अशातच पूजा बिरारीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेहंदी डे म्हणत फोटो शेअर केले आहेत. आता त्यांचा लग्नसोहळा कधी आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

| Updated on: Nov 29, 2025 | 8:41 PM
1 / 5
महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आता लवकरच सासरेबुवा होणार आहेत. त्यांचा लेक सोहम बांदेकरची लगीनघाई सुरू झाल्याचं दिसत आहे. सोहम मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja Birari) लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. पूजा बिरारीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.

2 / 5
बांदेकरांची होणारी सून पूजा बिरारीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजाच्या हातावर मेहंदी दिसत आहे. पूजाने सुंदर असा पिवळ्या रंगाचा घागरा घातला आहे. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी घातली आहे. या सिंपल लूकमध्ये पूजा अतिशय सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

3 / 5
पूजाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या हातातवर मेहंदी दिसत आहे. तसेच तिच्या घरात पाहुण्यांची लगबग देखील दिसत आहे. हे फोटो शेअर करत पूजाने सेहरा सजा के रखना असे कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच हे फोटो सोहम बांदेकरला टॅग केले आहेत. पूजाने फोटोच्या कॅप्शनमध्ये वापरलेल्या हॅशटॅगने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने #mehandiday #मजा असे म्हटले आहे.

4 / 5
सोहम आणि पूजा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे फोटोंवरुन स्पष्ट होत आहे. मात्र, त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. पूजा आणि सोहमचा विवाहसोहळा पुण्यात असणार की मुंबईत? कोणत्या दिवशी असणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

5 / 5
मराठी अभिनेत्री पूजा बिरारी आता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांची सुनबाई होणार आहे. अद्याप याबाबत बांदेकर कुटुंबीयांनी किंवा सोहम, पूजानं अधिकृतरित्या काहीच सांगितेलं नाही. पण पूजाने शेअर केलेल्या फोटोंवरुन हे तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता सर्वांना त्यांच्या विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली आहे.