
मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके अंदाजात आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

तिचे सगळेच फोटोशूट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. आतासुद्धा तिनं काही हटके फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

आता चक्क फॉर्मल लूकमध्ये तिनं फोटोशूट केलं आहे. काळ्या रंगाचं टॉप आणि त्यावर फॉर्मल कोट असा हा सोनालीचा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

‘A sunflower soul ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

नेहमीच वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करणाऱ्या सोनालीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना पसंतीस आला आहे.