सोनिया गांधींचं लहाणपणीचं घर कुठं आहे, आता मालक कोण? पहिल्यांदाच फोटो समोर!
सोनिया गांधी यांच्या कुटुंबानंतर हे घर गावातील दुसऱ्या एका कुटुंबाकडे होते. 2020 मध्ये हे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित होत असल्याने त्यांना हे घर एखाद्या भारतीय किंवा शीख कुटुंबाकडे जावे, अशी इच्छा होती.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जन्म इटलीतील वेनेटो प्रांतातील विसेंजा जिल्ह्यात असलेल्या लुसियाना या गावात झाला. डिसेंबर 1946 रोजी त्यांचा जन्म याच दोन मजली घरात झाला होता. सहा खोल्यांच्या या घरात त्यांनी बालपणीची सुरुवातीची वर्षे घालवली. (फोटो सौजन्य- एक्स- @JATs_Land)
सोनिया गांधी यांच्या बालपणीच्या या घराचे सध्याचे मालक सुखदेव सिंग कांग हे आहेत. मूळचे पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले कांग 1992 मध्ये व्यवसायासाठी इटलीत स्थायिक झाले. 2020 मध्ये त्यांनी पत्नी आणि मुलीच्या नावावर हे घर खरेदी केले. (फोटो सौजन्य- एक्स- @JATs_Land)
सोनिया गांधी यांच्या कुटुंबानंतर हे घर गावातील दुसऱ्या एका कुटुंबाकडे होते. 2020 मध्ये हे कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित होत असल्याने त्यांना हे घर एखाद्या भारतीय किंवा शीख कुटुंबाकडे जावे, अशी इच्छा होती. ही माहिती मिळताच सुखदेव सिंह कांग यांनी घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य- एक्स- @JATs_Land)
सोनिया गांधी यांच्याशी संबंधित आठवणी जपण्यासाठी कांग यांनी या घराचे संग्रहालय करण्याचे ठरवले आहे. घराची मूळ रचना कायम ठेवत त्यांनी केवळ आवश्यक दुरुस्ती केली आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक प्रशासनाच्या आवश्यक परवानग्याही मिळवल्या असून, घराच्या देखभालीसाठी ते दरवर्षी सुमारे एक हजार युरो खर्च करतात. (फोटो सौजन्य- एक्स- @JATs_Land)
या संग्रहालयात सोनिया गांधी यांच्या बालपणीच्या आठवणी जतन करण्यासाठी कांग यांना गांधी कुटुंबीयांची मदत हवी आहे. यासाठी ते भारतात येऊन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेण्याच्या प्रयत्नात आहेत. कुटुंबाचे जुने फोटो, ऐतिहासिक कागदपत्रे आणि वैयक्तिक वस्तू संग्रहालयात ठेवण्याची त्यांची योजना आहे.(फोटो सौजन्य- एक्स- @JATs_Land)