
टीम इंडियाचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 डिसेंबर रोजी कटकमध्ये खेळला जाईल. या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माला गुगलकडून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. (फोटो- ACC)

गुगलने 2025 च्या सर्वाधिक ट्रेंडिंग खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. कोणत्या देशात गुगलवर कोणत्या खेळाडूंना सर्वात जास्त सर्च केले गेले याची यादी जाहीर केली आहे. यात पाकिस्तानमध्ये गुगल ट्रेंडिंग यादीत टीम इंडियाचा अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर आहे. (फोटो- ACC)

भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा या वर्षी पाकिस्तानमध्ये गुगलवर नंबर 1 ट्रेंडिंग खेळाडू ठरला आहे. अभिषेक शर्माने बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांसारख्या पाकिस्तानी खेळाडूंना मागे टाकत पाकिस्तानमध्ये खळबळ उडवून दिली आहे. (फोटो- ACC)

पाकिस्तानमधील गुगल सर्च ट्रेंडमध्ये पाकिस्तानी स्टार खेळाडू बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी हे टॉप 10 मध्येही नाहीत. सैम अयुब सहाव्या स्थानावर होता. त्यामुळे यावर्षी पाकिस्तानी लोकांनी पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा अभिषेक शर्माला जास्त सर्च केले. (फोटो- ACC)

भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या खेळाडूमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अव्वल स्थानी आहे. आपल्या शानदार फलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या वैभवला भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले. गुगलवर टीम इंडियाच्या दोन डावखुऱ्या फलंदाजांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. (फोटो- ACC)