
भारताने पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 349 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ फक्त 332 धावा करू शकला. (फोटो- पीटीआय)

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेची सुरुवात निराशाजनक राहिली. अवघ्या 11 धावांवर 3 गडी गमावले होते. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने कमबॅक करत 49.2 षटकात सर्व गडी गमवून 332 धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय ट्विटर)

दक्षिण अफ्रिकेच्या या कामगिरीनंतर भारताच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सुरुवातीचे 3 विकेट 15 धावांच्या आत असूनही 300हून अधिक धावा केल्या. यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये असं कधीच घडलं नव्हतं. (फोटो- बीसीसीआय ट्विटर)

टीम इंडियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा इकोनॉमी रेट हा सहा पेक्षा जास्त होता. अर्शदीप सिंगने 10 षटकात 64 धावा, हार्षित राणाने 65 धावा, प्रसिद्ध कृष्णाने 7.2 षटकात 48 धावा, कुलदीप यादवने 68 धावा, रवींद्र जडेजा 9 षटकात 66 धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने 3 षटकात 18 धावा दिल्या. (फोटो- बीसीसीआय ट्विटर)

भारताच्या गोलंदाजीची कमकुवत बाजू यामुळे अधोरेखित झाली आहे. छोटं टार्गेट समोरच्याला टीमसमोर असेल तर मग कठीण होईल. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसारख्या गोलंदाजांची उणीव भासली. (फोटो- बीसीसीआय ट्विटर)