IPL 2026: लखनौ सुपर जायंट्समध्ये अर्जुन तेंडुलकरचं करिअर फसलं, आर अश्विनचं भाकीत खरं ठरलं!

आयपीएल 2026 स्पर्धेत प्रत्येक संघाचा एखाद दुसरा सामना शिल्लक आहे. या स्पर्धेतून लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघ बाद झाला आहे. असं असूनही एका गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अर्जुन तेंडुलकरचं काय? लखनौ सुपर जायंट्सने का नाही दिली संधी?

| Updated on: May 20, 2026 | 10:07 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने सुमार कामगिरी केली. आतापर्यंत खेळलेल्या 13 पैकी नऊ सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पदरात फक्त 8 गुण असून शेवटच्या स्थानी आहे. असं असताना शेवटचा सामना शिल्लक राहिला आहे. पण अर्जुन तेंडुलकरला काही संधी मिळाली नाही. आता लीग स्पर्धेत लखनौचा शेवटचा सामना पंजाब किंग्सशी 23 मे रोजी होणार आहे.

2 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत 11व्या सामन्यातच लखनौ सुपर जायंट्सचा खेळ आटोपला होता. 11 सामन्यानंतर प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही हे स्पष्ट झालं होतं. खरं तर उर्वरित सामन्यात काही खेळाडूंची चाचपणी करण्याची संधी होती. अर्जुन तेंडुलकरला संधी मिळेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही.

3 / 5
अर्जुन तेंडुलकरला एकाही सामन्यात खेळवलं नाही. पण लखनौ सुपर जायंट्स सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्कचा प्रचार करत होते. त्यामुळे त्याला संघात संधी मिळेल असं वाटलं होतं. पण त्याला काही संधी दिली नाही. लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे, तरी अर्जुनला डावललं जात आहे.

4 / 5
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांना लखनौ सुपर जायंट्सकडे ट्रेड केले. या आयपीएल हंगामात त्याला लखनौ संघाकडून अधिक संधी मिळण्याची अपेक्षा होती. आयपीएलच्या19 व्या हंगामापूर्वी माजी क्रिकेटपटू आर अश्विनने अर्जुन तेंडुलकरबद्दल एक भविष्यवाणी केली होती. त्याला संधी मिळणार नाही आणि तसंच झालं.

5 / 5
आर अश्विन म्हणाला होता की, अर्जुन तेंडुलकर खेळणार नाही. त्याबद्दल न बोललेलंच बरं. मला वाटतं हे अवघड आहे, कारण संघात मयंक यादव, मोहसिन खान, आवेश खान आणि मोहम्मद शमी यांच्यासारखे वेगवान गोलंदाज आहेत. एवढ्या वेगवान गोलंदाजांसोबत तो कसा खेळणार? मला नाही वाटत की त्याच्या खेळण्याची काही आशा आहे. जोपर्यंत सर्व खेळाडू जखमी होत नाहीत, तोपर्यंत अर्जुन खेळणार नाही.  (सर्व फोटो टीव्ही 9 नेटवर्कवरून फाईल )

Follow Us