
ऑस्ट्रेलिया टेस्ट क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजमधील उर्वरित सामन्यांतून बाहेर झाला आहे. टीम मॅनेजमेंटने पॅटला भविष्यातील योजनेनुसार विश्रांती दिली आहे. त्यामुळे पॅट आता चौथ्या आणि पाचव्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. (Photo Credit: PTI)

पॅट उर्वरित कसोटी मालिकेत खेळणार नसल्याची माहिती टीम मॅनेजमेंटकडून देण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया हेडस कोच अँड्रयू मॅक्डॉनल्ड यांनीही याबाबत माहिती दिली आहे. (Photo Credit: PTI)

पॅट पहिल्या 2 सामन्यांमध्ये नव्हता. तर पॅटने तिसऱ्या सामन्यातून कमबॅक केलं. पॅटने त्याच्या नेतृ्त्वात ऑस्ट्रेलिया तिसरा सामना जिंकून दिला. मात्र आता पॅट नसल्याने उर्वरित सामन्यांमध्ये स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. स्मिथने पॅटच्या अनुपस्थितीत पहिल्या 2 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयी केलं होतं. (Photo Credit: PTI)

आता स्मिथ नेतृत्व करणार असल्याने इंग्लंडचं टेन्शन वाढलंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे. पॅटच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा कधीच पराभव झालेला नाही. (Photo Credit: PTI)

स्टीव्हन स्मिथ याने कमिन्सच्या जागी 8 कसोटी सामन्यांमध्ये कांगारुंचं नेतृत्व केलंय. स्मिथने त्यापैकी 7 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयी केलं आहे. तर एकमेव सामना हा अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे कॅप्टन म्हणून स्मिथ ही विजयी घोडदौड कायम राखण्यात यशस्वी ठरणार का? मालिकेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit: PTI)