आशिया कपमध्ये संजू सॅमसनने एमएस धोनीला टाकलं मागे, नोंदवला असा विक्रम

आशिया कप स्पर्धेत संजू सॅमसनची हवी तशी छाप काही पडली नाही. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 23 चेंडूत 39 धावा केल्या. यावेळी त्याने 3 षटकार आणि 1 चौकार मारत एक विक्रमा आपल्या नावावर केला.

| Updated on: Sep 27, 2025 | 7:59 PM
1 / 5
संजू सॅमसनने आशिया कप स्पर्धेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सुपर 4 फेरीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने हा रेकॉर्ड नोंदवला आहे. माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला. (Photo- ACC)

2 / 5
संजू सॅमसनने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 23 चेंडूत 39 धावा केल्या. यावेळी त्याने 3 षटकार आणि 1 चौकार मारला होता. या तीन षटकारांसह संजू सॅमसनने महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे. (Photo- ACC)

3 / 5
संजू सॅमसन टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याच्या नावावर आता 55 षटकार आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिला षटकार मारला तेव्हाच त्याने धोनीला मागे टाकलं होतं. (Photo- ACC)

4 / 5
संजू सॅमसनने टी20  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 55 षटकार मारले आहेत. तर महेंद्रसिंग धोनीने 52  षटकार मारले आहेत. ऋषभ पंतच्या नावर 44 षटकार, तर इशान किशनने 36 षटकार मारले आहेत. (Photo- ACC)

5 / 5
आशिया कप 2025 स्पर्धेत संजू सॅमसनने सहा षटकार मारले आहेत. 2016 च्या आशिया कपमध्ये धोनीने चार षटकार मारले होते. संजू सॅमसन एकाच हंगामात पाच किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा एकमेव भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. (Photo- ACC)