T20i : यूएईच्या फलंदाजाचा धमाका, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, जोस बटलर-रोहितला पछाडलं

Asia Cup 2025 Muhammad Waseem World Record : आशिया कप 2025 स्पर्धेत होम टीम अर्थात यूएईने आतापर्यंत 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीम याने ओमान विरुद्ध अर्धशतकी खेळी करत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

| Updated on: Sep 17, 2025 | 11:27 PM
1 / 5
आशिया कप 2025 स्पर्धेत होम टीम यूएईला विजयी सुरुवात करता आली नाही. मात्र यूएईने दुसऱ्या सामन्यात कमबॅक करत विजयाचं खातं उघडलं. यूएईने साखळी फेरीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात ओमानवर मात केली. यूएईच्या विजयात कॅप्टन मुहम्मद वसीम याने निर्णायक भूमिका बजावली. मुहम्मद वसीम याने यासह वर्ल्ड रेकॉर्डही केला. (Photo Credit : Asian Cricket Council)

2 / 5
वसीम ओमानविरुद्ध सलामीला खेळायला आला. वसीमने या सामन्यात 54 चेंडूत 69 धावांच खेळी केली.   वसीमने या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार लगावले.  वसीमचं टी 20I कारकीर्दीतील 24 वं अर्धशतक ठरलं. (Photo Credit : Getty Images)

3 / 5
वसीमने या खेळी दरम्यान वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. वसीमने टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 3 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली. वसीमने 1947 बॉलमध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या. वसीम कमी बॉलमध्ये वेगवान 3 हजार धावा करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला. (Photo Credit: Asian Cricket Council)

4 / 5
वसीमने इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलर याचा रेकॉर्ड ब्रेक केला. जोसने 2 हजार 68 बॉलमध्ये 3 हजार टी 20i धावा पूर्ण केल्या होत्या.  बटलरनंतर या यादीत तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरोन फिंच विराजमान आहे.फिंचने 2 हजार 77 बॉलमध्ये 3 हजार रन्स पूर्ण केल्या होत्या. (Photo Credit : PTI)

5 / 5
टीम इंडियाचा माजी टी 20i कर्णधार रोहित शर्मा याने 2 हजार 149 चेंडूत 3 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. रोहित या यादीत पाचव्या स्थानी आहे. तर चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हीड वॉर्नर आहे. वॉर्नरने 2 हजार 113 बॉलमध्ये 3 हजार रन्स केल्या होत्या. (Photo Credit : PTI)