AUS vs IND : विराट आता होऊनच जाऊदे, रविवारी किंग कोहली शतक करणार?

Virat Kohli vs Australia Odi : विराट कोहलीची गेल्या 5 एकदिवसीय डावात ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅट चांगलीच तळपळी आहे. मात्र विराट 5 डावात अर्धशतक करुनही शतक करण्यात अपयशी ठरलाय. त्यामुळे विराटकडून पर्थमध्ये शतकी खेळीची आशा आहे.

| Updated on: Oct 18, 2025 | 5:32 PM
1 / 5
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.उभयसंघातील पहिला एकदिवसीय सामना हा रविवारी 19 ऑक्टोबरला पर्थमध्ये होणार आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
विराटच्या कमबॅकमुळे क्रिकेट चाहत्यांना या मालिकेचे वेध लागले आहेत. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे विराटकडून या मालिकेतही अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध गेल्या 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये चाबूक कामगिरी केली आहे.  विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाचही डावात किमान अर्धशतकी खेळी केलीय.  विराटने गेल्या 5 डावात अनुक्रमे 84, 54, 85, 56 आणि 54 अशा धावा केल्या आहेत.  मात्र विराटला त्या खेळीचं शतकात रुपांतर करता आलेलं नाही. (Photo Credit : PTI)

4 / 5
विराटने या पाचही डावात 66 पेक्षा अधिकच्या सरासरीने एकूण 333 धावा केल्या आहेत. मात्र विराट या 5 पैकी एका डावातही शतक करु शकला नाही. त्यामुळे विराटकडून आता शतक अपेक्षित आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
विराटने एकदिवसीय कारकीर्दीत आतापर्यंत एकूण आणि सर्वाधिक 51 शतकं झळकावली आहेत. त्यामुळे आता सलग 5 प्रयत्नात अर्धशतक झळकावल्यानंतरही शतक करण्यात अपयशी ठरल्याने विराट ऑस्ट्रेलिया विरुद्ध सहाव्या वेळेस शतक करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI)