
रोहित शर्मा याने एडलेडमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कारकीर्दीतील 59 वं तर ऑस्ट्रेलिया विरूद्धचं 10 वं अर्धशतक झळकावलं. रोहितने 97 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्ससह एकूण 73 रन्स केल्या. रोहितने या खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. (Photo Credit : Bcci)

रोहितने 2 सिक्ससह खास विक्रम आपल्या नावावर केला. रोहित सेना देशात (साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 150 षटकार लगावणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला. (Photo Credit : Bcci)

रोहितने 2 धावा करताच महारेकॉर्ड आपल्या नावे केला. रोहित ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. (Photo Credit : Bcci)

रोहित टीम इंडियासाठी वनडेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. रोहितने याबाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार-फलंदाज सौरव गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Bcci)

तसेच रोहितने पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदी याचा 77 डावात प्रत्येकी 2 षटकार लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. रोहितची त्याच्या कारकीर्दीत एडलेडमधील 2 षटकार लगावण्याची एकूण 78 वी वेळ ठरली. (Photo Credit : Bcci)