
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा विश्वविक्रम रचला आहे. फक्त 15 चेंडूत त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. जमैकाच्या सबिना पार्क मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टार्कने शानदार गोलंदाजी केली. (फोटो- Getty Image)

दुसऱ्या डावातील पहिले षटक टाकणाऱ्या मिचेल स्टार्कने एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या. तिसऱ्या षटकात त्याने 6 धावा देऊन आणखी 2 विकेट्स घेतल्या. यासह त्याने फक्त 15 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या. यासह स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत पाच विकेट्स घेण्याचा मान मिळवला आहे. (फोटो- PTI)

यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा एर्नी टोशॅक, इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड आणि ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलँड यांच्या नावावर होता. एर्नी टोशॅकने 1947 मध्ये टीम इंडियाविरुद्ध 19 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या. स्टुअर्ट ब्रॉडने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 चेंडूत 5विकेट्स घेतल्या होत्या. स्कॉट बोलँडने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 19 चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या. (फोटो- PTI)

मिचेल स्टार्कने या तिघांचा विश्वविक्रम मोडून एक नवा इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 2.3 षटकांत पाच बळी घेतले. स्टार्कने कसोटी इतिहासात सर्वात कमी चेंडूत पाच बळी घेणारा गोलंदाज म्हणून विश्वविक्रम रचला आहे. (फोटो- PTI)

मिचेल स्टार्कने दुसऱ्या डावात 7.3 षटकं टाकत 9 धावा देत 6 गडी बाद केले. मिचेल स्टार्कने कसोटीत 400हून अधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या नावावर आता 402 विकेट आहेत. अशी कामगिरी करणारा दुसरा डावखुरा गोलंदाज आहे. यापूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने 414 विकेट सह हा मान मिळवला आहे. (फोटो- Getty Image)