लग्नानंतरच्या पहिल्याच सामन्यात झटका! कॅमरून ग्रीन संघाबाहेर; 19 महिन्यांनंतर ‘या’ खेळाडूची ऑस्ट्रेलियन संघात एन्ट्री

हरारे येथे सुरू असलेल्या या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या संघात कॅमरून ग्रीन नसल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला.

| Updated on: Sep 15, 2026 | 6:14 PM
1 / 5
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून कॅमरून ग्रीनला डावलण्यात आलं आहे. या संघात स्पेन्सर जॉन्सनचे 19 महिन्यांनंतर संघात पुनरागमन झाले आहे. पण कॅमरून ग्रीन डावलल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसणं सहाजिकच होतं. (Photo: PTI/Getty/Instagram)

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून कॅमरून ग्रीनला डावलण्यात आलं आहे. या संघात स्पेन्सर जॉन्सनचे 19 महिन्यांनंतर संघात पुनरागमन झाले आहे. पण कॅमरून ग्रीन डावलल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसणं सहाजिकच होतं. (Photo: PTI/Getty/Instagram)

2 / 5

कॅमरून ग्रीनने 4 सप्टेंबर रोजी त्याची दीर्घकाळाची मैत्रीण एमिली रेडवूडसोबत लग्न केले. लग्नानंतरचा हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता; मात्र खांद्याला आलेल्या सुजेमुळे त्याला या पहिल्या सामन्यातून बाहेर राहावे लागले आहे. (Photo: PTI/Getty/Instagram)

3 / 5

कॅमरून ग्रीनच्या जागी डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन याचे तब्बल 19 महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर ऑस्ट्रेलियाच्या वनडे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. त्याने आपला शेवटचा वनडे सामना गेल्या वर्षी चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान फेब्रुवारी महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. (Photo: PTI/Getty/Instagram)

4 / 5

ऑस्ट्रेलियाचे अनुभवी आणि मुख्य वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जॉश हेझलवूड या त्रिकुटाला या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीची संपूर्ण धुरा आता स्पेन्सर जॉन्सन, नाथन एलिस आणि जेव्हियर बार्टलेट यांच्या युवा खांद्यावर असेल. (Photo: PTI/Getty/Instagram)

5 / 5

झिम्बाब्वेविरुद्ध ऑस्ट्रेलियाची पहिल्या वनडेची प्लेइंग XI: मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, कूपर कोनोली, जॉश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी, मॅट रेनशॉ, ऑलिव्हर पीक, ॲडम झॅम्पा, स्पेन्सर जॉन्सन, नाथन एलिस आणि जेव्हियर बार्टलेट (Photo: PTI/Getty/Instagram)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us