IND vs ENG: अक्षर पटेलचा कारनामा, 12 चेंडूत संपवली 13 वर्षांची प्रतीक्षा
भारताने इंग्लंडला पहिल्या वनडे सामन्यात 258 धावांवर रोखलं. इंग्लंडविरुद्ध गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यात अष्टपैलू अक्षर पटेलने चार विकेट काढल्या. यासह रवींद्र जडेजाच्या विक्रमाशी बरोबरी केली.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलने जबरदस्त गोलंदाजी केली. लियाम डावसन आणि जो रूट हे दोघं तग धरून असताना जोडी फोडली. त्याने या स्पेलमध्ये इंग्लंडचा डाव उद्ध्वस्त केला. (PHOTO CREDIT- PTI)

अक्षर पटेल पहिल्या वनडे सामन्यात भारताचा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 9.5 षटकात 62 धावा दिल्या, पण चार विकेट घेतल्या. (PHOTO CREDIT- PTI)

अक्षर पटेलने स्पेलच्या शेवटच्या काही षटकात जबरदस्त गोलंदाजी केली. इंग्लंडचा संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जात असताना अक्षर पटेलने त्यांना रोखलं. चार फलंदाजांना झटपट बाद केलं. (PHOTO CREDIT- PTI)

अक्षर पटेलने लियाम डावसन, जोफ्रा आर्चर, जोश टंग आणि आदिल राशीदला तंबूचा रस्ता दाखवला. अक्षर पटेलने चार विकेट फक्त 12 चेंडूत घेतले. त्यामुळे इंग्लंडचा डाव 258 धावांवर थांबला.(PHOTO CREDIT- PTI)

वनडे क्रिकेटच्या इतिहासात 41 ते 50 षटकांमध्ये 4 विकेट घेणारा दुसरा भारतीय फिरकीपटू ठरला आहे. 13 वर्षांपूर्वी हा कारनामा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने केला होता. त्याने 2013 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये श्रीलंकेला शेवटच्या चार धक्के दिले होते. (PHOTO CREDIT- PTI)