
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दक्षिण अफ्रिकेने तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. बांगलादेशने दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 232 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 7 गडी गमवून 49.3 षटकात पूर्ण केलं. यासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. पण या सामन्यात सोरना अक्तरची खेळी महत्त्वपूर्ण ठरली.(Photo Credit: Getty)

वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत 18 वर्षीय अष्टपैलू शोरना अक्तरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बांगलादेशच्या तरुण खेळाडूने फलंदाजीमध्ये पदार्पण केले आणि बांगलादेशसाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला.(Photo Credit: Getty)

41 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बांगलादेशची तिसरी विकेट पडली. त्यावेळी संघाची धावसंख्या 150 होती आणि येथेच शोरना क्रीजवर आली. शोरना अख्तरने तिच्या प्रचंड धैर्याने डावाचे चित्र बदलले. तसेच मोठी खेळी करत बांगलादेशला चांगल्या स्थितीत आणलं. (Photo Credit: Getty)

शोरनाने एकदिवसीय क्रिकेटमधील तिचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. शोरनाने फक्त 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तसेच बांगलादेशसाठी महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला. (Photo Credit: Getty)

शोरना अक्तरने संघाची कर्णधार निगार सुल्तानाचा विक्रम मोडला. तिने 2024 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 39 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. शोरनाने फक्त 35 चेंडूत 51 धावा केल्या. यात तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. (Photo Credit: Getty)