
वूमन्स टीम इंडियाने बांगलादेशवर दुसऱ्या वनडेत 108 रन्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. मुंबईकर जेमिमाह रॉड्रिगज्स टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

जेमिमाह हीने बांगलादेश विरुद्ध बॅटिंग आणि बॉलिंगने धमाका केला.

जेमिमाहने 78 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीने 86 रन्सची खेळी केली.

जेमिमाहला कॅप्टन हरमनप्रीत हीने चांगली साथ दिली. हरमनप्रीत हीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं.

जेमिमाहने बॅटिंगने धुतल्यानंतर बॉलिंगने कहर केला. जेमिमाहने मारुफा अक्तरला आऊट केलं आणि बांगलादेश 120 धावांवर ऑलआऊट झाली. जेमिमाहने अवघ्या 3 ओव्हरमध्ये 3 धावा देत 4 विकेट्स घेतल्या

जेमिमाहने केलेल्या ऑलराउंड कामगिरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.