आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बेन स्टोक्स बिग बॅश लीग खेळणार? होकार देताच मिळणार इतके रुपये
बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता फक्त व्यावसायिक क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमधून नाव मागे घेतल्याने त्याला संधी मिळाली नाही. पण बिग बॅश लीग स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असं असताना आता बेन स्टोक्स फ्रेंचायझी क्रिकेट खेळण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, बेन स्टोक्स बिग बॅश लीग स्पर्धेत खेळू शकतो. (PC-PTI)

बेन स्टोक्सने 28 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे त्याच्याकडे आता मैदानात परतण्यासाठी फक्त फ्रेंचायझी लीगचा पर्याय आहे. काही टी20 लीग्समध्ये खेळण्यासाठी त्याने इच्छाही व्यक्त केली आहे. रिपोर्टनुसार, बेन स्टोक्स बिग बॅश लीग खेळणार आहे.(PC-PTI)

कोड स्पोर्ट्सच्या दाव्यानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण विश्वास आहे की बेन स्टोक्स 2026-27 बिग बॅश लीग स्पर्धेत खेळेल. यासाठी बीबीएल फ्रेंचायाझी त्याला संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत. यात सिडनी सिक्सर्स सर्वात आघाडीवर आहे. (PC-PTI)

सिडनी सिक्सर्सने बेन स्टोक्सला आपल्या सोबत घेण्यासाठी दावा दाखल केला आहे. इंग्लंडचा माजी प्रशिक्षक मॅथ्यू मॉट या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. स्टोक्सला संघात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर बेन स्टोक्सने होकार दिला तर त्याला यासाठी चांगली रक्कम मिळू शकते. (PC-PTI)

सिडनी सिक्सर्सने बेन स्टोक्सला थेट आपल्या संघात घेण्याचा विचार केला तर त्यासाठी 3 लाख डॉलर म्हणजेच 3 कोटी रूपयांपर्यंत मिळू शकतात. आता स्टोक्स काय निर्णय घेतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. (PC-PTI)