Auction: 7 खेळाडूंना मोठा झटका, फिक्सिंगच्या आरोपामुळे ऑक्शनमधून नाव हटवलं! करियर धोक्यात?

BPL 2026 Auction: बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेसाठी येत्या आठवड्यात ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. अशात या ऑक्शनआधी 7 खेळाडूंना फिक्सिंगच्या आरोपामुळे डच्चू देण्यात आला आहे.

Updated on: Nov 29, 2025 | 3:50 PM
1 / 5
बीपीएल अर्थात बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी मोसमासाठी लवकरच ऑक्शन होणार आहे. मात्र ऑक्शनच्या बरोबर 7 दिवसांआधी 7 खेळाडूंना मोठा झटका लागला आहे. या 7 खेळाडूंची नावं ड्राफ्टमधून हटवण्यात आली आहेत. या खेळाडूंवर फिक्सिंगचा आरोप आहे. (Photo Credit :  Instagram)

2 / 5
धक्कादायक म्हणजे या 7 खेळाडूंमध्ये 2 स्टार क्रिकेटपटूंचा समावेश आहे. फिक्सिंगचा आरोप असलेल्या या 7 खेळाडूंमध्ये मिजानुर रहमान, निहादुज्जमान, सुनजामुल इस्लाम, अनमुल हक बिजॉय, मोसद्देक हुसैन, अलाउद्दीन बाबू आणि शोफिउल इस्लाम यांचा समावेश आहे. (Photo Credit :  Instagram)

3 / 5
बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याआधीच 10 खेळाडूंना ते रेड झोनमध्ये असून त्यांना ऑक्शनमधून वगळण्यात येऊ शकतं, असे संकेत दिले होते. (Photo Credit :  Instagram)

4 / 5
बीसीबीने वगळलेल्या 7 खेळाडूंमध्ये अनमुल हक बिजॉय याचा समावेश आहे. अनमुल हा कॅप्ड खेळाडू आहे. अनमुल याने बांगलादेशचं तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. अनमुल 8 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 20 टी 20i सामने खेळला आहे. (Photo Credit :  Instagram)

5 / 5
अनमुल हक बिजॉय याने बीपीएल स्पर्धेत आतापर्यंत 131 सामने खेळले आहेत. अनमुलने या दरम्यान 2 हजार 776 धावा केल्या आहेत. अनमुलने या दरम्यान 1 शतक आणि 16 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit :  Instagram)