दिग्वेश राठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यात कोणाशी पंगा घेणार? एका सामन्याच्या बंदीनंतर परतणार!

आयपीएल साखळी फेरीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. एकाना स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना आरसीबीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील निकालावर टॉप 2 चं गणित सुटणार आहे.

| Updated on: May 27, 2025 | 3:26 PM
1 / 6
आयपीएल 2025 स्पर्धेतील 70वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना टॉप 2 चं गणित सोडवणार आहे. दुसरीकडे,  लखनौ सुपर जायंट्सचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या सामन्यात खेळणे जवळजवळ निश्चित आहे. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

2 / 6
आयपीएलमध्ये आपल्या नोटबुक सेलिब्रेशनने लक्ष वेधून घेणारा दिग्वेश राठी पहिल्यांदाच आरसीबीचा सामना करणार आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये नोटबुक सेलिब्रेशन करताना गैरवर्तन केल्याने दिग्वेशला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातून खेळला नव्हता. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

3 / 6
दिग्वेश राठीवरील एका सामन्याची बंदीची शिक्षा आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात खेळण्यास पात्र आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाच्या शेवटच्या लीग सामन्यात दिग्वेश राठीला प्लेइंग 11 मध्ये किंवा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संधी मिळू शकते. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

4 / 6
पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात दिग्वेश राठीने प्रियांश आर्यला बाद केल्यानंतर नोटबुक सेलिब्रेशनसह फलंदाजाला टोमणे मारले होते. तसेच मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात नमन धीरला आऊटच केल्यानंतर नोटबुक सेलिब्रेशन केले. यावेळी दिग्वेशची कृती पाहून त्याला त्याच्या मॅच फीच्या 75% दंड ठोठावण्यात आला. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

5 / 6
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला बाद करून दिग्वेश राठीने असंच गैरवर्तन केलं. त्यामुळे अभिषेक शर्मा त्याच्यात तू तू मै मै पाहायला मिळाली. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीसह त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

6 / 6