IPL 2026: ड्वेन ब्रावो आणि हर्षल पटेलचा मोठा विक्रम भुवनेश्वरच्या रडारवर, हेझलवूडने व्यक्त केल्या अशा भावना

Bhuvneshwar Kumar: आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यश मिळालं आहे. आता आरसीबीकडून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारकडे एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला उर्वरित सामन्यात भेदक गोलंदाजी करणं भाग आहे.

| Updated on: May 18, 2026 | 3:42 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात काही विक्रम अभेद्य आहेत. अजूनही त्या विक्रमांच्या आसपास कोणी पोहोचलेलं नाही. पण काही विक्रम आता मोडू शकतात अशी स्थिती आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा एक विक्रम आहे. आयपीएल 2013पासून या विक्रमाची चर्चा आहे. तर 2021 मध्ये या विक्रमाची बरोबरी झाली पण मोडला नाही.  (Photo: PTI)

2 / 5
आयपीएल स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक 32 विकेट घेण्याचा विक्रम ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना आयपीएल 2013 मध्ये ही कामगिरी केली होती. आयपीएल 2021मधघ्ये आरसीबीच्या हर्षल पटेलने ब्रावोच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्याने 32 विकेट घेतल्या होत्या.  (Photo: PTI)

3 / 5
पाच वर्षानंतर ड्वेन ब्रावो आणि हर्षल पटेल यांच्या नावावर हा संयुक्त विक्रम आहे. पण या पर्वात हा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. हा विक्रम आता भुवनेश्वर कुमारच्या रडारवर आहे. कारण या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. विशेष म्हणजे आरसीबी संघ प्लेऑफमध्ये पोहोचल्याने त्याच्याकडे ही संधी आहे.  (Photo: PTI)

4 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत खेळलेल्या 13 सामन्यात भुवनेश्वर कुमारने 24 विकेट घेतल्या आहेत. सध्या त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप असून 32 विकेटचा विक्रम मोडण्यासाठी 9 विकेटची गरज आहे. साखळी फेरीचा शेवटचा सामना शिल्लक आहे. त्यानंतर प्लेऑफ आणि अंतिम फेरीसाठी किमान दोन सामने असतील. त्यामुळे हा विक्रम मोडू शकतो.  (Photo: PTI)

5 / 5
भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी पाहून जोश हेझलवूड यानेही त्याचं कौतुक केलं आहे. हेझलवूडने सांगितलं की, आम्ही लकी आहोत की भुवनेश्वर कुमार आमच्या संघात आहे. तो विकेट घेण्यात सक्षम आहे आणि सर्व खेळपट्ट्या समजून घेण्यात माहिर आहे.  (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us