
टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर केएल राहुल याने इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील झंझावात कायम ठेवत तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये शतक ठोकलं. (Photo Credit : PTI)

केएल राहुलने तिसर्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी हे शतक झळकावलं. केएलने 176 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. केएलच्या कसोटी कारकीर्दीतील हे 10 वं शतक ठरलं. केएलचं हे इंग्लंड विरुद्धचं चौथं कसोटी शतक ठरलं. तसेच केएलचं हे या मालिकेतील ओपनर म्हणून दुसरं शतक ठरलं. केएलने याआधी लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात शतक केलं होतं. (Photo Credit : PTI)

केएलचं लॉर्ड्समधील हे दुसरं कसोटी शतक ठरलं. केएल यासह या मैदानात 1 पेक्षा अधिक शतक करणारा टीम इंडियाचा दुसरा तर दिलीप वेंगसरकर यांच्यानंतरचा पहिला फलंदाज ठरला. केएलने लॉर्ड्समध्ये याआधी 2021 साली शतक केलं होतं. तसेच केएलने 2018 सालीही ओव्हलमध्ये कडकडीत शंभर धावा केल्या होत्या. (Photo Credit : PTI)

केएलला पहिल्या डावात शतकानंतर आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र केएल शतक करताच आऊट झाला. केएलने 177 बॉलमध्ये 13 फोरसह 100 रन्स केल्या. (Photo Credit : PTI)

केएलने या कसोटी मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यांमधील 5 डावांत 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह 336 धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 49 चौकार लगावले. (Photo Credit : Bcci X Account)