Vaibhav Sooryavanshi याचं पदार्पण लांबणीवर, आता केव्हा संधी मिळणार?
Vaibhav Sooryavanshi Team India : वैभव सूर्यवंशी याला आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. आता वैभवला पदार्पणाची संधी केव्हा मिळणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना लागून आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात अनेक विक्रम करणाऱ्या वैभव सूर्यवंशी याची भारतीय संघात पहिल्यांदाच निवड करण्यात आली. मात्र वैभवला आयर्लंड विरुद्ध पदार्पणाची संधी काही मिळाली नाही. त्यामुळे वैभवला आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. (Photo Credit: Getty Images)

वैभवला आयपीएल स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदाच आयर्लंड विरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं. मात्र कर्णधार श्रेयस अय्यर आणि टीम मॅनेजमेंटने वैभवला दोन्ही सामन्यांत संधी दिली नाही. (Photo: Getty Images)

वैभवला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नाही. त्यामुळे वैभवला दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात संधी मिळेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र तसं न झाल्याने आता वैभवचं पदार्पण केव्हा होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. (Photo: Getty Images)

टीम इंडिया आयर्लंडनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वैभवची इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वैभवचं इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण होऊ शकतं. (Photo: Getty Images)

दरम्यान आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाकडून दोघांचं टी 20i पदार्पण झालं. वेगवान गोलंदाज प्रिंस यादव आणि ऑलराउंडर सूर्यांश शेडगे या दोघांचं आयर्लंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातून पदार्पण झालं. (Photo: PTI)