Womens Asia Cup 2026: भारताने आशिया कप जिंकला तरी चषक आणि पैसे मिळणार नाही, कारण…
वुमन्स आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना 13 सप्टेंबरला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होत आहे. यातील विजयी संघ अंतिम फेरीत भारताशी भिडणार आहे.

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने एन्ट्री मारली आहे. उपांत्य फेरीत बांगलादेशला 40 धावांनी पराभूत केलं आणि अंतिम फेरीत जागा पक्की केली. आता भारतीय क्रीडाप्रेमींना अंतिम फेरीचे वेध लागले असून विजयाच्या आशा आहे. कारण भारताने अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. (PC-GETTY IMAGES)
भारतीय महिला संघाने अंतिम फेरीचा सामना जिंकला तर ट्रॉफी आणि पैसै दोन्ही मिळणार नाहीत. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला का? तुम्हाला वाटतं तसं नाही. बीसीसीआय आशिया कप विजयाची रक्कम घेत नाही. हा पैसा इतर क्रिकेट मंडळांच्या प्रगतीसाठी देते. (PC-GETTY IMAGES)
आशिया कप ट्रॉफी मिळणंही कठीण आहे. त्याचं कारण थोडं वेगळं आहे. रिपोर्टनुसार, पीसीबी चीफ मोहसिन नकवी ट्रॉफी देण्यासाठी दुबईत जाणार आहे. भारतीय पुरूष संघाने मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. तसंच काहीसं भारतीय महिला संघ करेल. तेव्हा मोहसिन नकवीने भारतीय संघाला ट्रॉफी दिली नव्हती आणि हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. (PC-GETTY IMAGES)
टीम इंडियाने मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. ऑपरेशन सिंदूरनंतर हा निर्णय घेतला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भारतीय खोळाडूंनी नो हँड शेक पॉलिसी अवलंबली होती. इतकंच मोहसिन नकवी पीसीबीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री असल्याने त्याच्या हातून ट्रॉफी घेतली नाही. (PC-GETTY IMAGES)
आशिया कप ट्रॉफी स्पर्धेतील चषक भारतीय संघाला मिळणार की नाही हे 13 सप्टेंबरला सामना झाल्यानंतर स्पष्ट होईल. सध्या अंतिम फेरीत भारताविरुद्ध कोणता संघ असेल हा प्रश्न आहे. कारण दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे. विजयी संघ अंतिम फेरी गाठेल. (PC-GETTY IMAGES)