IPL 2026 : मिनी लिलावापूर्वीच माजी कर्णधाराने आयपीएल स्पर्धेतून घेतली माघार, 14 वर्षांचा प्रवास संपला

आयपीएल 2026 मिनी लिलावापूर्वी प्रत्येक संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने दिग्गज खेळाडूला रिटेन केलं नाही. त्यामुळे त्याच्यासाठी कोण बोली लावणार याची उत्सुकता होती. पण त्या आधीच ट्विस्ट आला आहे.

Updated on: Nov 29, 2025 | 9:09 PM
1 / 5
आयपीएल 2026 चा मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी होणार आहे. अनेक दिग्गज खेळाडूंवर या लिलावात बोली लागणार आहे. पण आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि सर्वात  अनुभवी खेळाडू असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने यावेळी लिलावात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो- बीसीसीआय)

2 / 5
 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार डू प्लेसिसने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत जाहीर केलं आहे. फाफ डू प्लेसिसने लिहिले की, "आयपीएलमध्ये 14 वर्षे घालवल्यानंतर, मी यावर्षी लिलावात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा निर्णय आहे आणि मी खूप कृतज्ञतेने घेतला आहे." (फोटो- पीटीआय)

3 / 5
चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना दोन आयपीएल जेतेपद जिंकवण्यात डू प्लेसिसचा मोठा हातभार होता. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. परंतु या वर्षीच्या लिलावापूर्वी दिल्ली फ्रँचायझीने त्याला सोडले. त्यानंतर 40 वर्षीय डू प्लेसिसने हा निर्णय घेतला आहे. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

4 / 5
फाफ पुढे लिहितो, '14 वर्षे हा खूप मोठा काळ आहे आणि मला अभिमान आहे की हा टप्पा माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. भारताचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि हा निश्चितच निरोप नाही. तुम्ही मला पुन्हा भेटाल. या वर्षी, मी एक नवीन आव्हान स्वीकारण्याचा आणि पीएसएलच्या आगामी हंगामात खेळण्याचा निर्णय घेतला आहे.' (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

5 / 5
2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा फाफ सात पर्व या फ्रँचायझीकडून खेळला. त्याने २०१८ आणि २०२१ मध्ये संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्स, आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सकडूनही खेळला. आयपीएलमध्ये आतापर्यंत 154 सामने खेळलेल्या फाफने 4773 धावा केल्या आहेत. यात 39 अर्धशतके आहेत. (फोटो- पीटीआय)