पोलार्ड-वॉर्नरसाठी अशक्य ते सुनील नारायण याने करुन दाखवलं, ऑलराउंडरची ऐतिहासिक कामगिरी
Sunil Narine IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्सचा बॉलिंग ऑलराउंडर सुनील नारायण याने गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात विक्रमी कामगिरी केली. सुनील अशी कामगिरी करणारा एकमेव विदेशी खेळाडू ठरला आहे. जाणून घ्या केकेआरच्या फिरकीपटूने काय केलंय.

केकेआरने शनिवारी 16 मे रोजी गुजरात टायटन्सवर 29 धावांनी विजय मिळवला. केकेआरसाठी 2 विकेट्स घेणारा सुनील नारायण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला. सुनीलने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. सुनील अशी कामगिरी करणारा पहिलाच विदेशी खेळाडू ठरला. (PHOTO CREDIT- PTI)

सुनील नारायण याचा गुजरात विरुद्धचा आयपीएल कारकीर्दीतील 200 वा सामना ठरला. सुनील यासह आयपीएल स्पर्धेत 200 सामने खेळणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला. (PHOTO CREDIT- PTI)

सुनीलने आयपीएल स्पर्धेत 2012 साली केकेआरकडून पदार्पण केलं. सुनील तेव्हापासून केकेआरसाठीच खेळतोय. सुनीलने या दरम्यान केकेआरला 3 वेळा चॅम्पियन करण्यात योगदान दिलंय. (PHOTO CREDIT- PTI)

आयपीएल स्पर्धेत विदेशी खेळाडू म्हणून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुनीलनंतर किरॉन पोलार्ड आणि डेव्हिड वॉर्नर संयुक्तरित्या दुसर्या स्थानी आहेत. दोघेही प्रत्येकी 184 सामने खेळले आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

तसेच सुनील नारायण आयपीएल स्पर्धेत 200 आणि त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा एकमेव विदेशी गोलंदाज आहे. सुनीलनंतर ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या स्थानी आहे. ब्राव्होने 183 विकेट्स मिळवल्या आहेत. तर राशिद खान याने 174 विकेट्स मिळवल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)