आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफच्या शर्यतीपासून गुजरात टायटन्स फक्त दोन विजय दूर, असं आहे गणित

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 39व्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह आयपीएल पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ झाली आहे. प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स दोन विजय दूर आहे.

| Updated on: Apr 22, 2025 | 10:41 PM
1 / 6
इंडियन प्रीमियर लीगचे 40 सामने पूर्ण झाले आहेत. या सामन्यांनंतर आयपीएलच्या गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्सने आठ पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि त्यांचे 12 गुण आहेत.

2 / 6
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यानुसार +1.104 च्या निव्वळ धावगतीसह एकूण 12 गुणांसह प्रथम स्थानावर आहेत.

3 / 6
गुजरात टायटन्सचे अजूनही सहा सामने शिल्लक आहेत आणि जर त्यांनी यापैकी फक्त दो सामने जिंकले तर त्यांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.

4 / 6
आयपीएल प्लेऑफसाठी पात्रता मिळविण्याची शर्यत सहसा 14 गुणांपासून सुरू होते. 14 गुण असलेल्या संघाला टॉप 4 मध्ये राहण्यासाठी इतर संघांच्या जय-पराजय आणि धावगतीवर अवलंबून राहावे लागेल.

5 / 6
गुजरात टायटन्सला स्वतःच्या बळावर प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी किमान 16 गुणांची आवश्यकता असेल. त्यामुळे गुजरात टायटन्सने सहा पैकी दोन सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.

6 / 6
गुजरातचे पुढील सहा सामने राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. (सर्व फोटो- गुजरात टायटन्स ट्विटर)