हार्दिक पांड्याच्या 28 चेंडूत नाबाद 59 धावा, पण नावावर झालं शतक; कसं ते जाणून घ्या

हार्दिक पांड्याने दुखापतीतून सावरल्यानंतर टीम इंडियात कमबॅक केलं आहे. आशिया कप स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. पण आता पहिल्याच सामन्यापासून फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे.

| Updated on: Dec 09, 2025 | 10:11 PM
1 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाची नाजूक स्थिती होती. मात्र अशा स्थितीत हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला. त्याच्या आक्रमक अर्धशतकी खेळीने टीम इंडियाला 172 धावांपर्यंत मजल मारता आली.  (Photo-BCCI Twitter)

2 / 5
कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये इतर फलंदाजी धावा करण्यासाठी धडपड करत होते. मात्र एका बाजूने हार्दिक पांड्या आक्रमक बाणा दाखवत फटकेबाजी करत होता. भारताच्या 78 धावांवर 4 विकेट अशी स्थिती असताना हार्दिक मैदानात उतरला होता. त्या मैदानाचा त्याच्यावर काही एक परिणाम झाला नाही. त्याने आक्रमक खेळी केली.  (Photo-BCCI Twitter)

3 / 5
हार्दिक पांड्याने 28 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 59 धावांची खेळी केली. त्याने 210.71 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा कोणताही गोलंदाज त्याच्या आक्रमक खेळीतून सुटू शकला नाही.  (Photo-BCCI Twitter)

4 / 5
हार्दिक पंड्या त्याच्या खेळीदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला होता. हार्दिक पंड्याचे सहावे टी20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक आहे. तसेच जानेवारी 2025  नंतरचे त्याचे पहिलेच अर्धशतक होते.  (Photo-BCCI Twitter)

5 / 5
हार्दिक पांड्याने चौथ्या षटकारासह टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100  षटकारांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा भारताचा चौथा फलंदाज ठरला. पण पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू म्हणून अशी कामगिरी करण्याचा मान मिळवला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनीही षटकरांचं शतक केलं आहे.  (Photo-BCCI Twitter)