
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप सुपर 4 फेरीतील सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारतसमोर 172 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. तीन झेल सोडल्याने भारताला 75 धावांचा फटका बसला आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याने या सामन्यात विक्रम रचला आहे. (Photo- ACC)

हार्दिक पांड्या हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला. त्याने फखर जमानला बाद केलं आणि त्याला मागे टाकलं. (Photo- BCCI Twitter)

हार्दिक पांड्याने 118 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 97 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, युझवेंद्र चहलने 80 सामने खेळत 96 विकेट घेतल्या आहेत. युझवेंद्र चहलला मागच्या दोन वर्षांपासून खेळण्याची संधी मिळाली नाही. चहलने ऑगस्ट 2023 मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. (Photo- BCCI Twitter)

हार्दिक पंड्या हा भारताकडून टी20 मध्ये 100 बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनू शकतो. यापूर्वी अर्शदीप सिंगने ओमानविरुद्ध एक बळी घेतला आणि 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता. आता ही संधी हार्दिककडे आहे. (Photo- BCCI Twitter)

हार्दिक पांड्याने टी20 आशिया कप स्पर्धेतही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या राशिद खान आणि वानिंदु हसरंगा यांची बरोबरी केली आहे. हार्दिक पांड्यासह या तिघांनी प्रत्येकी 14 विकेट घेतल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)