टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्कार टाकला तर पाकिस्तानचं काय खरं नाही! आयसीसी करणार 3 कारवाई

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला आता दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. पण पाकिस्तानची आडमुठी भूमिका सुरूच आहे. सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच स्पर्धेत खेळण्याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका पीसीबीने घेतली आहे. पाकिस्तानने बहिष्कार टाकला तर चार ठिकाणी कोंडी होऊ शकते

| Updated on: Jan 27, 2026 | 4:06 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी बांगलादेशची नाटकं संपल्यानंतर पाकिस्तानने दुसरा अंक सुरू केला आहे. टी20 वर्ल्डकप खेळायचा की नाही? किंवा भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्काराची चर्चा पीसीबीकडून सुरू आहे. यासाठी पीसीबीने चेंडू पाकिस्तान सरकारच्या कोर्टात टाकला आहे. पण पाकिस्तानने या स्पर्धेतून किंवा सामन्यातून माघार घेतली तर आयसीसी कारवाईचा बडगा उगारेल. (Photo- ACC/Asian Cricket)

2 / 5
पाकिस्तानी मिडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने या स्पर्धेतून माघार घेतली तर आयसीसी पीसीबीवर 38 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 350 कोटी रुपयांचा खटला भरू शकते. इतकंच काय भारतविरुद्धच्या सामन्यात खेळले नाही तरी हा दावा ठोकला जाऊ शकतो. प्रसारक पीसीबीवर भरपाईसाठी दावा दाखल करू शकतात. (Photo- ACC/Asian Cricket)

3 / 5
पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून माघार घेतली तर आयसीसी पाकिस्तानवर कारवाई करेल. वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या जागतिक स्पर्धांमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. (Photo- ACC/Asian Cricket)

4 / 5
पाकिस्तानला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न खेळणं महागात पडू शकतं. कोणतंही क्रिकेट बोर्ड खेळाडूंना पाकिस्ता सुपर लीग स्पर्धेत खेळण्यासाठी एनओसी देणार नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं नुकसान होईल. (Photo- ACC/Asian Cricket)

5 / 5
पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी या मुद्द्यावर संभ्रमात टाकणारी विधानं करत आहेत. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूही स्पर्धेतून माघार घेण्याचा सल्ला देत आहेत. पण आयसीसीचे कठोर नियम आणि दंड पाहता, पाकिस्तान या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता कमी आहे. (Photo- ACC/Asian Cricket)