
ऑस्ट्रेलियाने वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध 300 पार मजल मारली. ऑस्ट्रेलियाने 338 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या स्फोटक बॅटिंगसह अनेक रेकॉर्ड्स केले. (Photo Credit : PTI)

ऑस्ट्रेलियाची ओपनर फोबी लिचफिल्ड हीने भारतात टीम इंडिया विरुद्ध दुसरं एकदिवसीय शतक झळकावलं. फोबीने 119 रन्स केल्या. फोबीने 77 चेंडूत शतक केलं. फोबी यासह वर्ल्ड कप स्पर्धेतील बाद फेरीत सामन्यात वेगवान शतक करणारी फलंदाज ठरली. तसेच फोबी बाद फेरीत शतक करणारी सर्वात युवा महिला क्रिकेटर ठरली. फोबीने 22 वर्ष 195 व्या दिवशी ही कामगिरी केली. (Photo Credit : PTI)

फोबी या वर्ल्ड कप स्पर्धेत शतक करणारी ऑस्ट्रेलियाची सहावी फलंदाज ठरली. यासह ऑस्ट्रेलिया एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 6 शतकं करणारी पहिली टीम ठरली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5 शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला. इंग्लंडच्या फलंदाजांनी 1993 आणि 2017 साली वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येकी 5-5 शतकं केली होती. (Photo Credit : PTI)

ऑलराउंडर एश्ले गार्डनर हीने टीम इंडिया विरुद्ध 63 धावा केल्या. गार्डनरने यासह या स्पर्धेतील 5 डावात एकूण 328 धावा केल्या. गार्डनर यासह वर्ल्ड कप स्पर्धेत सहाव्या किंवा त्यानंतर खालील स्थानी येऊन 300 पेक्षा अधिक धावा करणारी पहिला महिला फलंदाज ठरली. (Photo Credit: Getty Images)

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी या सामन्यात एकूण 9 षटकार लगावले. ऑस्ट्रेलिया यासह वर्ल्ड कप स्पर्धेतील नॉक आऊट मॅचेसमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारी टीम ठरली. (Photo Credit : PTI)