
दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट हीने वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. लॉराने एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. (Photo Credit : PTI)

लॉराने एलीसा हीलीला पछाडत हा महारेकॉर्ड केला. एलिसानने 2022 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 509 धावा केल्या होत्या. तर लॉराने आता एलीसाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (Photo Credit : PTI)

लॉराने या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच लॉरा या स्पर्धेत सर्वाधिक 3 शतकं करणारी फलंदाज आहे. लॉराने या स्पर्धेतील अनेक सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. (Photo Credit : PTI)

लॉराने वर्ल्ड कप स्पर्धेत 14 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात याआधी अशी कामगिरी कोणत्याह फलंदाजाला करता आली नव्हती. लॉराने मिताली राजचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : PTI)

लॉराने या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं झळकावली आहेत. लॉराने या स्पर्धेत 4 अर्धशतकं केली आहेत. तसेच लॉराने या स्पर्धेत सर्वाधिक 71 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)