
टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये साखळी फेरीतील एकूण 9 सामने जिंकले. टीम इंडियाच्या या 9 विजयांमध्ये मोठी भूमिका बजावली. साखळी फेरीत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

विराट कोहली याने वर्ल्ड साखळी फेरीत सर्वाधिक धावा केल्या. विराटने 9 सामन्यात 594 धावा केल्या.

सर्वाधिक धावांबाबत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आहे. क्विंटनने या वर्ल्ड कपमध्ये 4 शतकांसह 591 धावा केल्या.

न्यूझीलंडचा युवा रचिन रवींद्र याने आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये धमाका केला. रचिनने 9 मॅचमध्ये 565 धावा केल्या.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने 2019 नंतर यंदाही 500 प्लस धावा केला. रोहितने 9 सामन्यात 503 रन्स केल्या.

तर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि ओपनर बॅट्समन याने आपल्या अखेरच्या वर्ल्ड कपमध्ये धमाका केला. वॉर्नरने 9 सामन्यात 499 धावा केल्या.