Shubman Gill : सुपरफास्ट शुबमन, प्रिन्सचा मोठा कारनामा, वनडेत नंबर 1 कामगिरी
India vs Afghanistan 1st Odi : टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. शुबमनने भारताच्या विजयात बॅटिंगने योगदान दिलं. शुबमनने या दरम्यान खास कामगिरी केली.

टीम इंडियाने मायदेशात अफगाणिस्तानवर एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. कर्णधार शुबमन गिल याने या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक आणि नाबाद 84 धावा केल्या. शुबमनने या दरम्यान 47 वी धाव करताच मोठा कारनामा केला. (Photo Credit : PTI)

शुबमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 3 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. शुबमनने यासह माजी भारतीय फलंदाज शिखर धवन याचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit : PTI)

शुबमनने शिखर धवनच्या तुलनेत 10 डावांआधी 3 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. शुबमनने अवघ्या 62 डावांत ही कामगिरी केली. तर शिखरला 3 हजार धावा करण्यासाठी 72 डावांत फलंदाजी करावी लागली होती. (Photo Credit : PTI)

तसेच शुबमन वेगवान 3 हजार धावा करणारा एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 3 हजार धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमला याच्या नावावर आहे. आमलाने अवघ्या 57 डावांत ही कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI)

शुबमनने वेगवान 3 हजार एकदिवसीय धावा करण्यासह खास हॅट्रिक पूर्ण केली आहे. शुबमनने याआधी टीम इंडियासाठी वेगवान 2 हजार आणि 1 हजार धावा करण्याचीही कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI)