
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये तर दुसरा सामना ॲडलेडमध्ये ६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. तसेच तिसरा सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवला जाणार आहे. बॉक्सिंग डे टेस्ट 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये होणार आहे आणि शेवटची टेस्ट सिडनीमध्ये 3 जानेवारीपासून सुरू होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेकडे क्रीडाविश्वाचं लक्ष लागून आहे. कारण या मालिकेवरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. असं असताना पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दोन धक्के बसले आहेत. रोहित शर्मा वैयक्तिक, तर शुबमन गिल कोपराच्या दुखापतीमुळे पर्थ कसोटीत खेळणार नाही.

सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना बीसीसीआय निवड समितीने या दोन जागा भरल्या आहेत. युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल याचा भारतीय संघात प्रवेश झाला आहे.

देवदत्त पडिक्कल नुकताच भारत ए संघाकडून ऑस्ट्रेलियात खेळला आहे. त्यामुळे त्याची शुबमन गिलच्या जागी संघात निवड करण्यात आली आहे.

वेगवान गोलंदाज यश दयाल याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. यश दयालला राखीव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलं आहे. एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाल्यास त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज , आकाश दीप, परदीश कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडिक्कल.