
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना जिंकला. रोहितला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. मात्र यानंतरही कॅप्टन रोहितने मोठा विक्रम केला आहे.

रोहित वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. रोहितने 8 ऑक्टोबर रोजी कर्णधार म्हणून वयाच्या 36 वर्ष 161 व्या दिवशी टीम इंडियाचं नेतृत्व केलं.

टीम इंडियाचे दुसरे वयस्कर कर्णधार म्हणून मोहम्मद अझहरुद्दीन आहेत. अझहरुद्दीन यांनी 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये वयाच्या 36 वर्ष 124 व्या दिवशी टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळलं होतं.

तिसऱ्या स्थानी टीम इंडियाची द 'वॉल' आणि विद्यमान हेड कोच राहुल द्रविड आहेत. द्रविडने 2007 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळली होती. तेव्हा द्रविडचं वय हे 34 वर्ष 71 दिवस इतकं होतं.

चौथ्या स्थानी माजी कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन आहेत. श्रीनिवास यांनी 1979 च्या विश्व चषकात टीम इंडियाची सूत्रं सांभाळली होती. तेव्हा श्रीनिवास यांचं वय हे 34 वर्ष 56 दिवस इतकं होतं.

तसेच वर्ल्ड कपमधील वयस्कर भारतीय कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी याचा पाचवा क्रमांक लागतो. धोनी2011 नंतर 2015 मध्येही टीम इंडियाचा कॅप्टन होता. तेव्हा धोनीचं वय हे 33 वर्ष 262 दिवस इतकं होतं.